वाचनाची आवड असणारी व्यक्ती आपोआपच पुस्तकांशी प्रेम करते. पुस्तक म्हणजे अखंड ज्ञानाचा स्त्रोत जो कधीच कमी होत नाही. प्रत्येक येणाऱ्या नवीन व्यक्तीला ती तेवढंच ज्ञान देत राहते. त्यामुळे पुस्तक म्हणजे स्वतःच एक असिमित विश्व आहे. त्यामुळेच एक पुस्तक विद्रोह करू शकते, एक पुस्तक प्रेम करू शकते, एक पुस्तक ज्ञान देऊ शकते, एक पुस्तक तिरस्कारही करू शकते, आपण कोणत्या प्रवाहात जायचं हे आपल्या आवडीवर अवलंबून असतं. पुस्तक खरतर कित्येक वर्ष आपलं ज्ञान सांभाळून ठेवण्याचंही एक साधन आहे. कित्येक पिढ्या जातात पण ते ज्ञान तसेच टिकून राहते , लिखित स्वरूपात अगदी कित्येक काळ. त्यामुळे पुस्तक म्हणजे एक जिवंत व्यक्ती असते. एक आयुष्य असते , एक बोलकी कथाही असते.

हेच ज्ञान अखंड लोकांपर्यंत पोहचत राहावे व त्यातून लोकांना वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने १९९५ पासून दर वर्षी २३ एप्रिलला जागतिक पुस्तक दिवस हा संपूर्ण जगभर साजरा केला जाऊ लागला. हा दिवस साजरा करण्यासाठी युनेस्को (United Nations Educational scientific and cultural organizations) ने पुढाकार घेतला. जागतिक स्तरावर या दिवसाचे कित्येक कार्यक्रम साजरे केले जाऊ लागले. या दिवसाची संकल्पना Spanish लेखकाने सर्व प्रथम मांडली. या दिवसाचे औचित्य साधून नवनवीन पुस्तकांना प्रकाशित करण्यासाठी सुद्धा प्रोत्साहन दिले जाऊ लागले.

त्यामुळेच, जागतिक पुस्तक दिनानिमित्त एक संकल्प नक्की करा , सतत ज्ञान घेत राहावे, कित्येक नवनवीन पुस्तक वाचावे, आपल्या मनातले चार शब्द, लिहिण्याचा प्रयत्नही करावे!!! पुस्तकाच्या विश्वात हरवून जावे !!!

Share This:
आणखी वाचा:  भारतीय संविधान || ठळक मुद्दे आणि थोडक्यात माहिती ||