Valentines day special..

Share This

गुलाबाची पाकळी… !!

"गुलाबाची ती पाकळी
 मला आजही बोलते!!
 तुझ्या सवे घालवलेले
 क्षण पुन्हा शोधते!!

 शब्दांच्या या वहीत
 लिहून काहीतरी ठेवते!!
 सुकुन गेली तरी पुन्हा
 सुगंध आजही देते!!

 मी आहे तु आहेस
 ती आठवण आजही असते!!
 वहीतल्या या शब्दांना
 चोरुन गोष्ट ती सांगते!!

 गुलाबाची पाकळीच ती
 व्यक्त काय ती करते!!
 तुझ्या मनातील त्या शब्दांना
 वाट मोकळी करते!!

 हसते खुदकन केव्हा तरी
 हळुच काय ती बोलते!!
 तुझ्या ओठांवरचे हसु जणु
 माझ्या ओठांवरती पहाते!!

 गुलाबाची ती पाकळी
 मला आजही खुप बोलते .. !!!"

 -योगेश खजानदार

Next Post

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने || 8 MARCH ||

Wed Mar 8 , 2017
समाज, रुढी, परंपरा यांच्या जाचातून आजपर्यंत फक्त स्त्रीच भरडली गेली. ऐवढं असुनही आजही ती पुरुषांच्या बरोबरीने चालते. आजही स्त्री कोणत्याच बाबतीत पुरुषांनपेक्षा कमी नाही. जसं एक पुरुष कुटुंबाची गरज भागवु शकतो तशी आज एक स्त्री ही भागवु शकते.