Valentines day special..

14 Feb ..

भावना !!

"कधी हळुवार यावी
 कधी वादळा सारखी यावी
 प्रेमाची ही लाट आता
 सतत मनात का असावी?

 तु सोबत यावी
 ऐवढीच ओढ लागावी
 मनातल्या भावनांची जणु
 नाव किनारी का जावी?

 समोर तु असावी
 सतत ह्रदयात रहावी
 चेहरा तुझा पहाण्यास
 नजरेने धडपड का करावी?

 साथ तुझी अशी असावी
 भेट तुझी रोज व्हावी
 वाट तुझी चालताना
 वेळ अनावर का व्हावी?

 मला माझी शुद्ध नसावी
 तुझीच आठवण रहावी
 स्वतःस ही शोधताना
 तुच मझ का सापडावी?

 हे प्रेम की भावना असावी
 तुझ्यासवे आयुष्यभर रहावी
 सुटताच येऊ नये अशा बंधनात
 मला कायमची का अडकावी?"

 -योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*

READ MORE

मन आणि तू..!|| TU MARATHI KAVITA ||

एका मनाची ती अवस्था तुला आता कसे मी सांगू तुझ्याचसाठी त्याचे रुसणे त्यास आता कसे मी समजावू तु नस…
Read More

हरवलेले क्षण || MARATHI KAVITA ||

विस्कटलेलं हे नातं आपलं पुन्हा जोडावंस वाटलं मला पण हरवलेले क्षण आता पुन्हा सापडत नाहीत कधी दुर …
Read More

तुझ्यात मी ..!! Tujyat Mi !!

समोर तु असताना तुझ्यात मी मिळून जाते तुझ्यासाठी कविता लिहिणारे ते ह्रदय ही निशब्द होऊन राहते शोधते …
Read More

नयन ते.. !!! NAYAN MARATHI POEM ||

आठवताच तुझा चेहरा सखे शब्दांसवे सुर गीत गाते पाहताच तुझ नयन ते मन ही मझ का उगा बोलते मागे जावी त…
Read More

क्षण || KSHAN MARATHI POEM ||

काही क्षण बोलतात काही क्षण अबोल असतात काही क्षण चांगले तर काही क्षण वाईट असतात आपले कोण असतात परके…
Read More

आठवण || AATHVAN MARATHI KAVITA ||

धुंध त्या सांजवेळी मन सैरभैर फिरत आठवणींना वाट मिळे डोळ्यात दिसत तु आहेस ही जाणीव तु नाहीस हा भ…
Read More

Next Post

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने || 8 MARCH ||

Wed Mar 8 , 2017
समाज, रुढी, परंपरा यांच्या जाचातून आजपर्यंत फक्त स्त्रीच भरडली गेली. ऐवढं असुनही आजही ती पुरुषांच्या बरोबरीने चालते. आजही स्त्री कोणत्याच बाबतीत पुरुषांनपेक्षा कमी नाही. जसं एक पुरुष कुटुंबाची गरज भागवु शकतो तशी आज एक स्त्री ही भागवु शकते.