Valentines day special..

Share This

13 Feb..

‘मनातील..!’

"तो ओठाचा स्पर्श अजुनही
 जाणवतो मला माथ्यावर
 तुझ्या भावना अबोल होऊन
 बोलल्या त्या मनावर
 माझीच तु आणि तुझाच मी
 एक जाणीव होती नात्यावर
 विसरुन जाईल जग हे सारे
 जादु कसली ही क्षणांवर!!

 तो ओठाचा स्पर्श अजुनही
 जाणवतो मला हातावर
 तुझ्या सवे चालताना
 सोबत हवी त्या वाटांवर
 कधी नसेल एकटाच मी
 जाणीव करते मनावर
 देईन साध तुझी अखेरपर्यंत
 सांगतो तो स्पर्श ह्रदयावर!!

 तो ओठाचा स्पर्श अजुनही
 जाणवतो मला गालावर
 रुसलेल्या मला तो जणु
 बोलतो या ह्रदयावर
 क्षणात जातो राग कुठे
 दिसतो ना मनावर
 तो ओठाचा स्पर्श तुझ्या
 हसु उमटवतो माझ्या ओठावर.. !!!"

 -योगेश खजानदार

Next Post

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने || 8 MARCH ||

Wed Mar 8 , 2017
समाज, रुढी, परंपरा यांच्या जाचातून आजपर्यंत फक्त स्त्रीच भरडली गेली. ऐवढं असुनही आजही ती पुरुषांच्या बरोबरीने चालते. आजही स्त्री कोणत्याच बाबतीत पुरुषांनपेक्षा कमी नाही. जसं एक पुरुष कुटुंबाची गरज भागवु शकतो तशी आज एक स्त्री ही भागवु शकते.