Content
12 Feb..
तुझ्या मिठीत
"ती तुझी मिठी मला खुप काही बोलायची!! मी आनंदात असताना जवळ मला घ्यायची!! कधी खुप दुर असताना ओढ मला लावायची!! आणि जवळ येताच अश्रुनांही विसरुन जायची!! ती तुझी मिठी मला खुप काही सांगायची!! कधी स्वतःला हरवुन माझीच होऊन जायची!! त्या दोन हाताच्या बंधनात सार जग सामावुन जायची!! आणि माझ्या स्वप्नांना मनातल्या गोष्टी सांगायची!! ती तुझी मिठी मला खुप समजुन घ्यायची!! माझ्या ओठांवरचे शब्द अचुक टिपायची!! रुसलेल्या मला कधी चटकन मनवायची!! आणि जवळ तु येताच तुझीच होऊन जायची.. !!" -योगेश खजानदा