गुलाबाची पाकळी… !!
"गुलाबाची ती पाकळी मला आजही बोलते!! तुझ्या सवे घालवलेले क्षण पुन्हा शोधते!! शब्दांच्या या वहीत लिहून काहीतरी ठेवते!! सुकुन गेली तरी पुन्हा सुगंध आजही देते!! मी आहे तु आहेस ती आठवण आजही असते!! वहीतल्या या शब्दांना चोरुन गोष्ट ती सांगते!! गुलाबाची पाकळीच ती व्यक्त काय ती करते!! तुझ्या मनातील त्या शब्दांना वाट मोकळी करते!! हसते खुदकन केव्हा तरी हळुच काय ती बोलते!! तुझ्या ओठांवरचे हसु जणु माझ्या ओठांवरती पहाते!! गुलाबाची ती पाकळी मला आजही खुप बोलते .. !!!" -योगेश खजानदार