दरवाज्याची बेल वाजते नी शीतल पटकन दरवाजा उघडायला जाते, दरवाजा उघडताच समीर तिला समोर दिसला. त्याला पाहताच ती थोडी चिडल्या स्वरातच बोलू लागली.
"काय हे वागणं समीर ??"
समीर फक्त तिच्याकडे पाहत राहिला. तिला समीरच वागणं जरा वेगळं वाटू लागलं.
"दारू पिऊन आलायस समीर ??"
"हो !! पिऊन आलोय मी दारू !!" समीर दरवाजातून आत येत म्हणाला.
"बस एवढंच राहील होत आता !! "