photography of a person pointing on something

एक जिद्द म्हणजे तरी काय ??|| Motivational quotes|| Must Read

ध्येयवेड्या माणसास नकोच खंत कोणती !!
मार्ग एक चालताच , नसावी त्यास भीती !!
प्रयत्न जणू असे करावे, हरण्याची नसावी गिनती !!
रुतेल तो काटा अपयशाचा, पण मन नसेल दुःखी !!

आठवणीतील तु..!!

मी विसरावे ते क्षण
की पुन्हा समोर आज यावे
सहज आठवणीने तेव्हा
जुने ते पान उलटावे

का सोबतीस तु
मला येऊन भेटावे
जुन्या त्या वाटेवरती
साथ देत आज जावे

मनातली कविता

एक आर्त हाक मनाची
पुन्हा तुला बोलण्याची
तुझ्यासवे सखे मनातील
खुप काही ऐकण्याची

तुझ्याचसाठी पावसाची
ढगाळल्या नभाची
तु नसताना समोर आज ती
बेधुंद होऊन बरसण्याची

मनातली सखी

कधी कधी मनातली सखी
खुपच भाव खाते
पाहुनही मला न पहाता
माझ्या नजरेत ती रहाते
चांदण्याशी बोलताना मात्र
खुप काही सांगते
माझ्याशी अबोल राहुन मात्र
फक्त मला छळते

कवितेतील ती ..!!

सोबतीस यावी ती
उगाच गीत गुणगुणावी ती
अबोल नात्यास या
पुन्हा बहरून जावी ती

रिमझिम पाऊस ती
एक ओली वाट ती
मनातल्या आकाशात या
इंद्रधनुष व्हावी ती

वाट

मी वाट पाहिली तुझी
पण तु पुन्हा आलीच नाही
वाटेवरती परतुन येताना
तुझी सोबत भेटलीच नाही

क्षणात खुप शोधताना तुला
स्वतःस मी सापडलो नाही
मी आणि तुझ्यात तो
माझाच मी राहिलो नाही

अखेर

मी हरलो नाही
मृत्युच्याही डोळ्यात पाहुन
अखेर मी हरलो नाही

मी एकटा ही नाही
अंताच्या या प्रवासात
अखेर मी एकटा नाही

अनोळखी वाटेवर

अनोळखी वाटेवर
ती मला पुन्हा भेटावी
सोबत माझी देण्यास तेव्हा
ती स्वतःहून यावी

थांबावे थोडे क्षणभर तिथे
ती वाट वाकडी पहावी
माझ्यासवे चाललेली ती
आठवणींची पाऊलखुण दाखवावी

पाहुनी तुझ एकदा !!

पाहुनी तुझला एकदा
मी पुन्हा पुन्हा का पहावे
नजरेतुनी बोलताना
ते शब्द घायाळ का व्हावे

घुटमळते मनही तिथेच
तुझ्या वाटेवरती का फिरावे
तुला भेटण्यास ते पुन्हा
कोणते हे कारण शोधावे

मन आणि तू..!!

एका मनाची ती अवस्था
तुला आता कसे मी सांगू
तुझ्याचसाठी त्याचे रुसणे
त्यास आता कसे मी समजावू

तु नसताना तुझ्याचसाठी
त्याचे आठवणे कसे मी विसरु
तु असताना तुझ्याचसाठी
त्याचे गुणगुणे कसे मी ऐकवु

1 2