“शीतल काही विचारायचं होत !! ”
“विचार ना !!”
“पुण्याला कशी जाणार आहेस ?? म्हणजे त्रिशा ??”
“तिचं काय रे !!ती राहील तुमच्या सोबत इथे !! ”
“पण ती राहील तुझ्याशिवाय !!”
“तिला राहावं लागेल !!” शीतल नकळत बोलून गेली.
समीर काहीच बोलला नाही.शीतलला त्याच्या शांततेचा अर्थ कळायला वेळ लागला नाही.
“समीर !! थोडे दिवस फक्त पुन्हा तुम्ही सगळे याना माझ्याकडे !! खूप मोठी संधी आहे समीर !! आज जर सुटली ना तर आयुष्यभर मला पश्चाताप होईल !!”
“पण ती खूप लहान आहे अजून !! राहील ती तुझ्याशिवाय अस वाटत नाही !! “
