उन्हाळ्याचे दिवस आणि त्यातून दुपारची वेळ, एक निवांत मिळालेला क्षण आणि पुढे काय करावं हा प्रश्न. मग लॅपटॉप ऑन करून त्यावर एखादा चित्रपट पहायचं ठरलं. मनाशी तस ठरवलं सुद्धा. पण मन कुठेतरी वेगळीकडेच हरवून गेले होत. सगळं काही ट्राय करून बसलो, मित्रांशी फोनवर बोललो, चॅटिंग केली.