सकाळ होताच आकाश आपल्या कामाला लागतो. पण तरीही त्याच मन नकळत दिनेश कर्णिक यांच्या विचारांवर फिरत होत. आपण कुठेतरी चुकत आहोत याची जाणीव त्याला होत होती. थोड्यावेळाने त्यानं त्यांना भेटायचं ठरवलं. आवरून तो त्यांनी दिलेल्या पत्त्यावर गेला. एक भलामोठा वाडा होता तो. त्यामध्ये चहूबाजूंनी झाडे होती. आकाशला आतमध्ये जाताच पिंपळाच्या पानाचा वाऱ्याने होत असलेला आवाज ऐकू येत होता. मध्येच एखादी चिमणी चिवचिव करत होती
