भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !!
तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ??

भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !!
तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ??
आठवणींचा समुद्र आहे जणु
तु सतत लाट होऊन का यावीस
कधी मन ओल करुन माझे
तु पुन्हा का परतावी
वार्यासवे कधी वाहताना
मी तुझी वाट त्यास सांगावी
ती प्रत्येक झुळुक तेव्हा
तुझा भास होऊन का यावी
त्या वार्यानेही तुला छळावे
सतत तुझे केस उडावे
तु त्यास पुन्हा सावरावे
तरी तो ऐकत नाही ना
बघुन एकदा तुला जावे
पुन्हा पुन्हा परतुन यावे
तरी त्या पानांस आज
करमत नाही ना
न कळावे मनाला काही
तुझे हे भाव सखे
तु रुसताना ओठांवरती
हळुवार ते एक हास्य दिसे
कसे समजावे डोळ्यांना ही
ते पाहतात ती तुच असे
रागावलेल्या कडां मध्ये ही
माझे चित्र का अंधुक दिसे
मला काही ऐकायचंय
तुला काही सांगायचंय
मनातल्या प्रेमाला
कुठे तरी बोलायचंय
लाटां सोबत दुर जाताना
डोंगराशी भेटायचंय
आठवणींच्या नदीला
समुद्राशी बोलायचंय
दिवस माझे नी तुझे
गोड त्या स्वप्नातले
चांदण्या रात्रीचे क्षण
परतुन आज यावे
सखे सोबत तुझी
अंधारल्या त्या रात्री
लागी मनाला ओढ
आज मिठीत यावे