आजचे ते क्षण, उद्याची आठवण व्हावी !!
सहज जगल्या क्षणांचे, जणू मोती बनवावी

आजचे ते क्षण, उद्याची आठवण व्हावी !!
सहज जगल्या क्षणांचे, जणू मोती बनवावी
दृष्टी कथा भाग ४ ,नक्की वाचा !!
प्रिती तुला माझ्याकडुन घटस्फोट हवाय !! हीच माझ्या प्रेमाची किँमत !! नाही प्रिती हे होणार नाही !! तुला मी माझ्यापासून दूर जावू देणार नाही !! बस्स !! आजपर्यंत खूप ऐकून घेतलं तुझ प्रिती !! दहा वर्ष छळलस मला त्या अनिकेतच्या आठवणीत !! तुला तुझ प्रेम मिळालं !! तू त्याच्याकडे निघून जातेय !! खरतर एका परपुरूषाशी तू माझ्या समोर प्रेमाची कबुली देत आहेस !! आणि मी फक्त बघत बसलो! !! माझ्यावर खोट प्रेम केलंस तू !! नाटक केलंस!! त्या अनिकेतला फसवलस,! नाही प्रिती इतक्या सहज मी तुला माझ्यापासून वेगळं होऊ देणार नाही !! तुला आता माझ्यापासून वेगळं एकच गोष्ट करू शकेल आणि तो म्हणजे मृत्यु
प्रिती पुढे काहीच बोलत नाही. ती खोलीत निघून जाते. सूरज भरल्या डोळ्यांनी आपल्या संसाराची झालेली वाताहत पाहत राहतो. हताश होतो. त्याच मन सुन्न होत. डोळ्या समोर फक्त अंधार होतो. रात्रभर त्या गॅलरी मध्ये बसून तो प्रितीच्या आणि त्याच्या कित्येक गोड आठवणीं पाहत राहतो. कित्येक वेळ सिगारेट ओढत राहतो.
“अनिकेत एक विचारू ??”
अनिकेत तिच्याकडे पाहत म्हणतो.
“विचारतेस काय !! बोल ना !!”
“आज सकाळ पासून पाहतेय मी !! तुझा मूड मला काही ठीक वाटत नाहीये !! काही प्रोब्लेम तर नाहीना ??”
अनिकेत क्षणभर शांत बसतो आणि बोलतो.
“नाही ग !! काही प्रोब्लेम नाही!!”
“मग असा गप्प गप्प का आहेस ?”
“कुठ गेली होतीस प्रिती ?? आणि तुझा फोन बंद का लागतोय ??
“स्वतःला सावरतच प्रिती बोलते.
“मैत्रिणीकडे गेले होते!!!”
“यायला उशीर का झाला ??”
“झाला उशीर !! जाऊदे ना आता !! जाऊन झोप बर तू !!” प्रिती थोड्या चिडल्या आवाजात बोलते.
“कुठ गेली होतीस प्रिती !! खरं सांग !! त्या अनिकेतला भेटायला गेली होतीस ना ??”
प्रिती अगदी रागात येत म्हणाली.
आपण एका गोड स्वप्नात असावं आणि अचानक आपल्याला जाग यावी असच काहीसं अनिकेतला वाटत होत. रात्रभर त्याला या गोष्टीने झोपच लागली नाही. प्रिती त्याच्यासाठी आता फक्त एक भुतकाळ होता. पण तो भुतकाळ पुन्हा वर्तमान होऊन आला तर काय करावं हेच त्याला कळल नव्हतं. तिच्या त्या अचानक समोर येण्याने त्याला क्षणभर का होईना भूतकाळाच्या त्या जुन्या आठवणीत नेलं होतं.
“चला !! घरी जायचं की इथेच थांबायचं आज ??” अनिकेत श्वेताला मिश्किल हसत म्हणाला.
“थांबुयात ना मग इथेच !! ” श्वेता हसत म्हणाली.
“चला आता !! ” अनिकेत खुर्चीवरून उठतं म्हणाला.