Skip to main content
Old Notebook Paper

जुन्या पानावरती!!

नकळत जुन्या पानावरती, भेट तुझी झाली!सुकून गेल्या गुलाबाची, पाकळी एक मिळाली! पुसटश्या त्या सांजवेळी, ओढ तुझी लागली!कवितेतल्या त्या जगात मग, चिंब भिजत राहीली!! कधी शब्दातून, कधी नजरेतून, उगाच बोलत बसली!इथे कधी मग, तिथे असेल बघ, उगाच शोधत फिरली!! मनास कोणता भास असा हा, मलाच विचारू लागली!आठवांच्या या दुनियेत मला तू, सहज घेऊन चालली!! वाट अशी […]

Read More

विरोध ..(कथा भाग ५)

भाग ५  अनिकेतलाही आता प्रितीच्या अश्या विचित्र वागण्याचा त्रास होऊ लागला होता. प्रितीला थोड लांब करत तो तिला बोलू लागला. “पण मला तुला बोलायचं नाहीये प्रिती !! तुला कळत कस नाहीये की हे आता शक्य नाहीये !!! तुझ लग्न झालंय प्रिती !! आणि मीही माझ्या संसारात, आयुष्यात सुखी आहे !! “ “मग सोडून देऊयात हे सगळं […]

Read More

सांजवेळ

ती झुळूक उगा सांजवेळी
मला हरवून जाते
मावळतीच्या सुर्यासवे
एक गीत गाते
त्या परतीच्या पाखरांची
जणू ओढ पहाते
ती झुळूक उगा सांजवेळी
गंध पसरवून जाते

Read More