भेट ..!!

मनात माझ्या तुझीच आठवण
तुलाच ती कळली नाही
नजरेत माझ्या तुझीच ओढ
तुलाच ती दिसली नाही

सखे कसा हा बेधुंद वारा
मनास स्पर्श करत नाही
हळुवार पावसाच्या सरी बरसत
तुलाच का भिजवून जात नाही

एक तु

एक सांजवेळ आणि तु
गुलाबी किरणातील गोड भास तु
मंद वारा आणि झुळूक तू
मन माझे आणि विचार तु

मला न भेटावी की हरवतेस तु
मनास का एक आस तु

मी एक शुन्य

भावनेच्या विश्वात
आपुलकीच्या जगात
सैरभैर फिरूनी
मी एक शुन्य

प्रेमाची ही गोष्ट
भरगच्च पानात
वाचुनही शेवटी
मी एक शुन्य

शेवटचं एकदा बोलायचं होत

“शेवटचं एकदा मलाबोलायचं होत!!प्रेम माझ तुलासांगायच होत!! सोडुन जाताना मलाएकदा पहायच होत!!डोळ्यातली आसवांनाबोलायचं होत!! का कसे कोण जाणेनात हे तुटत होत!!चुक तुझी की माझीमन हे