खरंच सांग एकदा
आठवणी मिटता येतात
वाळुवरच्या रेषां सारख्या
सहज पुसता येतात

विसरुन जाव म्हटलं
तरी लाटां सारख्या येतात
दुर्लक्ष करावे म्हटलं
तरी मन ओले करतात

सुगंध मातीचा
पुन्हा दरवळु दे
पड रे पावसा
ही माती भिजु दे

शेत सुकली पिक करपली
शेतकरी हताश रे
नकोस करु थट्टा
जीव माझा तुझ्यात रे

एक होता राजा
माझा जाणता राजा
शिवाजी तेचे ऐसे नाव

स्वराज्याचा ध्यास तो
आमचा इतिहास तो
क्षण क्षण ही आज बोलती
जय जिजाऊ जय शिवराय।।