माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते.
गणपतीची पट्टी || Ganapati Utsav ||
गणपती यायच्या महिना आधी एका छापखान्यात जाऊन ५- १० रुपयांचे पावती पुस्तक आणायचे , मग सगळ्या मित्रांनी ठरवायचं कुठे पट्टी मागायची ,कधी जायचं , कमीत कमी किती पट्टी जमा करायची, सगळं काही ठरवलं जायचं. मग कोणी ५ रुपये द्यायचे , कोणी ११ रुपये तर कोणी २१ , ओळखीतल कोणी असेल तर लगेच ५१ रुपये द्यायचे. सगळ्या पट्टीचा हिशोब एकाच मित्राकडे असायचा.
तुमच्या आयुष्याचे निर्णय कोण घेत ? तुम्ही की दुसरं कोण ? || Marathi Lekh ||
चालताना आपल्याला भूक लागते, तहान लागते आपण क्षणभर शांत बसतो , खाऊन घेतो आणि पुन्हा पुढच्या वाटेवर चालायला लागतो. तेव्हा आपण गरज म्हणून आपल्या सोबत ठेवतो त्या वस्तू म्हणजे पाणी, खाण्यासाठी थोडे पदार्थ. तसच काहीस आपण यशाकडे वाटचाल करताना आपल्याला गरज असते ती आपल्याला चालवत ठेवणाऱ्या एखाद्या वस्तूची. जी कोणत्याही स्वरूपात असेल.
वाढदिवस || तिथी की तारीख || Marathi ||
या इंटरनेटच्या जगात काहीही भेटत हे मी चांगलच जाणून होतो. मग सुरू केला शोध आईच्या वाढदिवसाच्या तारखेचा. मंगळवार आणि द्वादशी एवढंच ते काय माहित होत. कित्येक वेबसाइट्स शोधल्या, जुने पंचांग पाहीले आणि अखेर ती तारीख मला मिळालीच, १८ जुलै १९६७ वार मंगळवार आणि द्वादशी हे सगळं या तारखेत आज्जीने सांगितलं तस जुळून आल आणि आईचा वाढदिवस त्यानंतर १८ जुलैला साजरा होऊ लागला.
मी एक प्रवाशी स्त्री || STRI MARATHI ESSAY ||
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता।या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना॥या ब्रह्माच्युत शंकरप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता।सा माम् पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा॥ ज्या सरस्वतिचे, ज्या विद्येच्या देवीचे आपण वंदन करतो ती देवी सरस्वती एक स्त्री रूपच आहे आणि तिला वंदन करताना स्त्री या शब्दाची व्याप्ती किती मोठी आहे हे कळल्या शिवाय राहणार नाही. समाज घडला आणि घडत गेला तो समाजातील महिलांच्या …
Continue reading "मी एक प्रवाशी स्त्री || STRI MARATHI ESSAY ||"
मी आणि माझी आई . || AAI MARATHI ESSAY ||
"बडबड करणारी आई क्षणभर जरी अबोल झाली तरी मुलाला नकोस होत. घरात आल्या आल्या नजरेत नाही दिसली तरी बैचेन होत. आईने आपल्याला चुकून जरी हाक मारुन नाही बोलावलं तरी मन आईला शोधत फिरत आणि या आईरुपी मायेच्या झाडाला अलगद येऊन बिलगत. आई नावाचं हे झाड किती जरी वठल तरी त्याची सावली हवीहवीशी वाटते ,त्या सावलीत बसून एकदा डोक्यावरती फिरलेला तिचा हात जणू मंद वाऱ्याची झुळूक वाटते, आणि त्या मायेच्या कुशीत साऱ्या जगाची किंमत शून्य वाटते. "
हो मला बदलायचं आहे ..!! || MARATHI LEKH ||
आयुष्यात आपण कित्येक निर्णय घेतो, पण त्या निर्णयावर आपण कसे ठाम राहतो याला जास्त महत्त्व असतं. पण आपण घेत असलेले निर्णय हे आपल्यासाठी आणि सर्वांसाठीही तितकेच महत्वाचे आणि उपयोगी असावे
हरवलेल्या गावाकडे || GAVAKADCHYA GOSHTI ||
संध्याकाळच्या वेळी गावाकडच्या त्या चावडीवर म्हाताऱ्या लोकांची मस्त मैफिल बसायची. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या आणि एखाद दोन शिव्याही हसडल्या जायच्या. पण यातही सगळं कस अगदी मजेत असायचं.