नभी चंद्र तो चांदण्यासवे, उगाच आतुर आहे !!
शुभ्र पसरल्या प्रकाशातही, तुलाच शोधत आहे!!
कधी पुसावे वाऱ्यासही, तुझीच आठवण आहे!!
कधी निखळत्या ताऱ्यातही, तुलाच मागणे आहे !!
नभी चंद्र तो चांदण्यासवे, उगाच आतुर आहे !!
शुभ्र पसरल्या प्रकाशातही, तुलाच शोधत आहे!!
कधी पुसावे वाऱ्यासही, तुझीच आठवण आहे!!
कधी निखळत्या ताऱ्यातही, तुलाच मागणे आहे !!
वाट ती तुझ्या येण्याची!! आता पाहवत नाही !!
क्षणात यावे तुझ्या जवळ!! पण ते शक्य होत नाही !!
सांग काय करावे क्षणाचे?? तुझ्याविणा ते पूर्ण नाही !!
श्वास घ्यावा नुसता !! पण हे जगणे नाही !!
साद कोणती या मनास आज
चाहूल ती कोणती आहे!!
तुझ्या आठवांचा पाऊस आज
मज चिंब का भिजवत आहे??
“नकळत साऱ्या भावनांचे
ओझे आज का झाले
काही चेहरे ओळखीचे त्यात
काही अनोळखी का निघाले!!
बोलल्या भावना मनाशी तेव्हा
सारे गुपित उघडे का झाले
क्षणभर सोबती हसवून जाता
आपलेच का रडवून गेले!!
धुंध त्या सांजवेळी
मन सैरभैर फिरत
आठवणींना वाट मिळे
डोळ्यात दिसत
तु आहेस ही जाणीव
तु नाहीस हा भास
मनही हल्ली गंमत करत