तुझ्या मिठीत || TUJHYA MITHIT ||
ती तुझी मिठी मला
खुप काही बोलायची
मी आनंदात असताना
जवळ मला घ्यायची
कधी खुप दुर असताना
ओढ मला लावायची
आणि जवळ येताच
अश्रुनांही विसरुन जायची
ती तुझी मिठी मला
खुप काही बोलायची
मी आनंदात असताना
जवळ मला घ्यायची
कधी खुप दुर असताना
ओढ मला लावायची
आणि जवळ येताच
अश्रुनांही विसरुन जायची
तुझ नी माझं नातं हे
अगदी गोड असावं
तुझ्याकडे पहातचं मी
मला पूर्णत्व मिळावं
कधी हसुन रहावं
तर कधी मनमोकळ बोलावं
अश्रुना ही इथे येण्यास
आनंदाच कारण असावं
माझ्या एकट्या क्षणात
तु हवी होतीस
कुठे हरवले ते मन
तु पाहात होतीस
नसेल अंत आठवणीस
तु खुप दुर होतीस
साद या वेड्या मनाची
तु ऐकायला हवी होतीस
तुटलेल्या मनाला आता
दगडाची अभेद्यता असावी
पुन्हा नसावा पाझर त्यास
अश्रूंची ती जाणीव असावी
शब्द आहेत आठवणीतले
त्यास एक वाट असावी
कधी मन हे बावरे
हरवून जाते तुझ्याकडे
मिटुन पापणी ओली ती
चित्रं तुझे रेखाटते
पुन्हा तुझ पहाण्यास
डोळे हे शोधते
शोधुनही न सापडता
शब्दात येऊन भेटते!!”