मी एक शुन्य || SHUNYA MARATHI KAVITA ||

भावनेच्या विश्वात
आपुलकीच्या जगात
सैरभैर फिरूनी
मी एक शुन्य

प्रेमाची ही गोष्ट
भरगच्च पानात
वाचुनही शेवटी
मी एक शुन्य

कळत नकळत. .. || KALAT NAKALAT MARATHI KAVITA ||

कळत नकळत कधी
प्रेम मी केल होतं
तुला सांगावंस वाटलं
पण मनातच राहिल होत

चांदण्या मधील एक तु
खुप मी शोधलं होतं
चंद्रामागे शोधायचं
शेवटी मात्र राहिलं होतं

वेड मन || VED MANN || VIRAH KAVITA ||

रोज मन बोलत
आज तरी बोलशील
रुसलेल्या तिला
कशी आहेस विचारशील

भांडलो आपण
आता विसर म्हणशील
डोळ्यातील आसवांना
वाट करुन देशील

प्रेम आणि तु || PREM AANI TU || MARATHI KAVITA ||

प्रेम केलं तरी राग येतो
नाही केलं तरी राग येतो
तुच सांग प्रेम आहे की नाही

पाहील तरी राग येतो
नाही पाहिल म्हणून राग येतो
खर सांग चोरुन पाहतेस की नाही