भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !!
तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ??

भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !!
तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ??
अबोल या नात्याची
बोलकी एक गोष्ट आहे
मनातल्या भावनेस
शब्दांचीच एक साथ आहे
अनोळखी वाटेवर
ती मला पुन्हा भेटावी
सोबत माझी देण्यास तेव्हा
ती स्वतःहून यावी
थांबावे थोडे क्षणभर तिथे
ती वाट वाकडी पहावी
माझ्यासवे चाललेली ती
आठवणींची पाऊलखुण दाखवावी
शोधते मी स्वतःस कुठेतरी
तुझ्यातच तेव्हा हरवुन जाते
तुझ्याकडे पाहतंच राहावे
मन का मज ते सांगत राहते
डोळ्यात तुझ्या पाहताच
तुझ्याकडेच का ओढली जाते
मिठीत तुझ्या यावे आज
ती रात्र का बोलत राहते
कधी कधी वाटतं
अबोल होऊन रहावं
तुझ्याकडे पहात नुसत
तुझ बोलन ऐकावं
पापण्यांची उघडझाप न करता
एकटक तुझ्याकडे पहावं
आणि तुझ्या बरोबर सतत राहुन
फक्त तुझाच होऊन जावं
हिरमुसलेल्या फुलाला
पुन्हा फुलवायचंय
मना मधल्या रागाला
लांब सोडुन यायचंय
ओठांवरच्या हास्याला
पुन्हा शोधुन आणायचंय
सोडुन सारे रुसवे
नातं हे जगायचंय
कधी तरी तिच्या सवे
सार जग फिरायचंय
हातात तिचा हात घेऊन
सोबत तिची व्हायचंय
तुझी साथ हवी होती मला
सोबत चालताना
वार्या सारख पळताना
पावसात भिजताना
आणि ऊन्हात सावली पहाताना!!
तुझी साथ हवी होती मला
दुःखात रडताना
आनंदाने हसताना