भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !!
तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ??

भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !!
तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ??
बहरून गेला सांज तो वारा, चाहूल तुझ्या येण्याची !!
हुरहूर त्या ओल्या वाटेवरी का ? उगा तुला शोधण्याची !!
सांगतो अबोल शब्दास त्या काही, कविता तुझ्या प्रेमाची !!
प्रत्येक पान बोलेन मग तेव्हा, गोष्ट त्या आठवांची !!
शोधायचं आहे आज
माझेच एकदा मला
कधी कोणत्या वळणावर
भेटायचं आहे मला
“वाटा पडतात मागे
वळणे ही नवीन येतात
कधी सोबती कोणी
कधी एकांतात रहातात
अंधारल्या वेळी ही कधी
चंद्र तारे सोबत असतात
कधी सुर्यास्त येता जवळी
पक्षी घरट्या कडे जातात
चांदण्यात फिरताना
दुख मनात सलते
शुभ्र या चंद्रावरती
डाग लागले कसले
कुणी केला आघात
कोणते दुर्दैव असते
जीवन हे जगताना
जीवन एक प्रवास
जणु फुल गुलाबाचे!!
काट्यात उमलुन
टवटवीत राहायचे!!
हळुवार उमलुन
क्षणीक जगायचे!!
तोच आनंद खरा
मनी मानायचे!!
रोज मन बोलत
आज तरी बोलशील
रुसलेल्या तिला
कशी आहेस विचारशील
भांडलो आपण
आता विसर म्हणशील
डोळ्यातील आसवांना
वाट करुन देशील
आठवणींचा दिवा
मनात पेटता जणु
प्रेमाच्या या घरात
प्रकाश चहूकडे
भिंतीवरी सावली
चित्र जणु चालती
पाहता मी एकटी
डोळे ओलावले