सोबतीस यावी ती उगाच गीत गुणगुणावी ती अबोल नात्यास या पुन्हा बहरून जावी ती रिमझिम पाऊस ती एक ओली वाट ती मनातल्या आकाशात या इंद्रधनुष व्हावी ती
मिठीत माझ्या || MITHIT MAJHYA ||
आज शब्दांतुन तिला आठवतांना ती समोरच असते माझ्या कधी विरहात तर कधी प्रेमात रोजच सोबत असते माझ्या बरंच काही लिहिताना कधी अश्रु मध्ये असते माझ्या कधी कवितेतल्या प्रत्येक ओळीत तर कधी भावनेत असते माझ्या
तुझ्यात मी || TUJHYAT MI || LOVE POEM ||
शोधते मी स्वतःस कुठेतरी तुझ्यातच तेव्हा हरवुन जाते तुझ्याकडे पाहतंच राहावे मन का मज ते सांगत राहते डोळ्यात तुझ्या पाहताच तुझ्याकडेच का ओढली जाते मिठीत तुझ्या यावे आज ती रात्र का बोलत राहते
मन || MANN EK KAVITA ||
काहीतरी राहून जावं अस मन का असतं झाडावरची पाने गळताना उगाच का ते पहात असतं हे मिळावं ते रहावं स्वतःस का सांगत असतं काही तरी गमावल्यावर लपुन का ते रडतं असतं
मनातील..! || MARATHI LOVE POEM ||
"तो ओठाचा स्पर्श अजुनही जाणवतो मला माथ्यावर तुझ्या भावना अबोल होऊन बोलल्या त्या मनावर माझीच तु आणि तुझाच मी एक जाणीव होती नात्यावर विसरुन जाईल जग हे सारे जादु कसली ही क्षणांवर
एकांतात ही || EKANT KAVITA MARATHI ||
एकांतात बसुनही कधी एकट अस वाटतंच नाही घरातल्या भिंतींही तेव्हा बोल्या वाचुन राहत नाही तु एकटाच राहिलास इथे सोबत तुझ्या कोणीच नाही आयुष्यभर दुसर्यासाठी जगुन हाती तुझ्या काहीच नाही
तुझे रुसणे || LOVE POEM ||
न कळावे मनाला काही तुझे हे भाव सखे तु रुसताना ओठांवरती हळुवार ते एक हास्य दिसे कसे समजावे डोळ्यांना ही ते पाहतात ती तुच असे रागावलेल्या कडां मध्ये ही माझे चित्र का अंधुक दिसे
कुठे शोधुन सापडेल || KAVITA MARATHI ||
कुठे शोधुन सापडेल मनातील भाव सखे न बोलता न ऐकता तुला कळणारे डोळ्यात माझ्या दिसताच मनास तुझ्या बोलणारे आणि ओठांवर न येताच तुला ऐकु येणारे