कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !!
शर्यत || कथा भाग ३ || Sharyat Marathi Story ||
"भाडकाव माझं काम घेतो !! तुला तर आता जित्ता नाही सोडत !!" सखा कसाबस उठायचा प्रयत्न करतो. पण पुन्हा शिरपा त्याच्या हातावर लाथ मारतो. सखा जोरात खाली पडतो. "साहेबांच इतक्या वर्षांचा जवळचा माणूस आहे मी !! आणि काल एक दिवस नव्हतो तर तू कुठून आला र !!" सखा हात जोडून उभा राहायचा प्रयत्न करतो. "पर !! मला तुमचं काही माहीत नव्हतं शिरपा ! " "आता कळल ना !! निघायचं आता !! पुन्हा जर दुकानात दिसला तर जिता नाही ठेवायचो तुला !!" "पण साहेब ?? आप्पा !!"