१. एरोसोल डिस्पेन्सरचे पेटंट जॉन डी लिंडे यांनी केले. (१८६२)
२. इको फार्म डेअरी या न्यूयॉर्क मधील कंपनीने पहिल्यांदाच दूध काचेच्या बाटलीत विकण्यास सुरुवात केली. (१८७९)
३. भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीमधील सेंट्रल असेम्ब्ली मध्ये राजकिय पत्रे उधळून धुराचे बॉम्ब टाकले, यानंतर त्यांनी आत्मसमर्पण केले. (१९२९)
४. भारताने युनियन कार्बाईड विरूद्ध भोपाळ दुर्घटने बद्दल खटला दाखल केला.पुढे तो खटला अमेरिकन कोर्टाने फेटाळून लावला. (१९८५)
५. जपानचे पंतप्रधान मोरीहिरो होसोकावा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. (१९९४)
