१. सेंट पीटर्सबर्ग या शहराची स्थापना रशियन राजा पीटर द ग्रेट यांनी केली. पुढे हेच शहर रशियन साम्राज्याची राजधानी म्हणून नावारूपाला आले. (१७०३)
२. महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना करण्यात आली. (१९०६)
३. अफगाणिस्तान ब्रिटीश अमलातून बाहेर पडून आपले शासन तयार करण्यास यशस्वी झाला. अफगाणिस्तानास सार्वभौमत्व प्राप्त झाले. (१९२१)
४. तारापोरवाला मत्स्यालय मुंबई येथे सुरु करण्यात आले. (१९५१)
५. कम्युनिस्ट पक्ष ऑस्ट्रियामध्ये प्रतिबंधित करण्यात आला. (१९३३)
