सायली सोबत संबंध तोडल्या नंतर आकाश आता शांत झाला होता. कोणाशी जास्त बोलायचं नाही, कोणा मित्रात जास्त मिसळायचं नाही. जणू त्यानं स्वतःला स्वतःतच बंधिस्त करून घेतलं होतं. आत्ममग्न झालेला होता, जणू सुखही आपल्यात पाहत होता आणि दुःखही. या सगळ्या काळात त्याची एक सवय मात्र नेहमी त्याच्या सोबत होती. हस्तमैथून करण्याची. जणू आता त्याला त्यातच सुख सापडलं होत. मिळालेल्या मार्क्सना स्वीकारून त्याला पुढचा मार्ग पाहायचा होता.