"बडबड करणारी आई क्षणभर जरी अबोल झाली तरी मुलाला नकोस होत. घरात आल्या आल्या नजरेत नाही दिसली तरी बैचेन होत. आईने आपल्याला चुकून जरी हाक मारुन नाही बोलावलं तरी मन आईला शोधत फिरत आणि या आईरुपी मायेच्या झाडाला अलगद येऊन बिलगत. आई नावाचं हे झाड किती जरी वठल तरी त्याची सावली हवीहवीशी वाटते ,त्या सावलीत बसून एकदा डोक्यावरती फिरलेला तिचा हात जणू मंद वाऱ्याची झुळूक वाटते, आणि त्या मायेच्या कुशीत साऱ्या जगाची किंमत शून्य वाटते. "