अल्लड ते तुझे हसू मला
नव्याने पुन्हा भेटले
कधी खूप बोलले माझ्यासवे
कधी अबोल राहीले
बावरले ते क्षणभर जरा नी
ओठांवरती जणू विरले
अल्लड ते हसू मला का
पुन्हा तुझ्यात हरवून बसले

अल्लड ते तुझे हसू मला
नव्याने पुन्हा भेटले
कधी खूप बोलले माझ्यासवे
कधी अबोल राहीले
बावरले ते क्षणभर जरा नी
ओठांवरती जणू विरले
अल्लड ते हसू मला का
पुन्हा तुझ्यात हरवून बसले
भावनीक नात खरंचं खूप अवघड असतं तोडून टाकणं, त्याला दूर केलं तरी त्रास होतो आणि जवळ ठेवलं तरी अश्रून शिवाय काही मिळत नाही. माझ्या आणि प्रियाच्या मध्ये आता दुसरं कोणतं नात उरलंच नाही. ती माझी मैत्रीण कधी होऊ शकली नाही, ना ती माझी कधी सोबती होऊ शकली.
कधी कधी भास तुझे ते
उगाच तुला शोधतात सखे
पण ते मनातल्या मृगजळा सवे
मला स्वप्नात घेऊन जातात
हवंय काय या मनाला तरी
विचारलं मी कित्येक वेळेस
आणि हे मन मला तेव्हा
तुझ्याच प्रेमात घेऊन जातात
मनात माझ्या तुझीच आठवण
तुलाच ती कळली नाही
नजरेत माझ्या तुझीच ओढ
तुलाच ती दिसली नाही
सखे कसा हा बेधुंद वारा
मनास स्पर्श करत नाही
हळुवार पावसाच्या सरी बरसत
तुलाच का भिजवून जात नाही