खरतर दोघांच्या मध्ये तिसऱ्या माणसाचा हस्तक्षेप नात एकतर नीट करतो किवा उध्वस्त करतो. या दोघां बद्दल ही तेच झाल. मी म्हणालो म्हणून त्याने तिला रोज एक वाईट शब्द बोलत गेला

खरतर दोघांच्या मध्ये तिसऱ्या माणसाचा हस्तक्षेप नात एकतर नीट करतो किवा उध्वस्त करतो. या दोघां बद्दल ही तेच झाल. मी म्हणालो म्हणून त्याने तिला रोज एक वाईट शब्द बोलत गेला
मी वाट पाहिली तुझी
पण तु पुन्हा आलीच नाही
वाटेवरती परतुन येताना
तुझी सोबत भेटलीच नाही
क्षणात खुप शोधताना तुला
स्वतःस मी सापडलो नाही
मी आणि तुझ्यात तो
माझाच मी राहिलो नाही
वचन दिलं होतं नजरेस
फक्त तुलाच साठवण्याचं
तुझ्या सवे आठवणींचा
पुन्हा ती स्वप्ने पहाण्याच
मिटलेल्या डोळ्यातही
ह्रदयात तुला ठेवण्याचं
तुझ्या आठवणीत
अश्रुना त्या सावरण्याचं
आठवणीत झुरताना
कधी तरी मला सांगशील
डोळ्यात माझ्या पहाताना
कधी तरी ओठांवर आणशील
रोज सायंकाळी त्या वाटेवर
वाट माझी पहाशील
मंद दिव्यात रात्री
चित्र माझे रेखाटशील
धुंद हे सांज वारे
छळते तुला का सांग ना?
का असे की कोण दिसे
एकदा तु सांग ना!!
डोळ्यात हे भाव जणु
विरह हा तो कोणता
भावनेस शब्द दे
एकदा तु सांग ना!!