पाहता पाहता आकाश आता नव्या मित्रात, नव्या वातावरणात मिसळून गेला. आपल्या जुन्या गोष्टी विसरून नव्या जगात गेला. या जगात तो अजुन नव्या वर्तुळात अडकत गेला, मित्रांच्या संगतीने आणि खिशातील बाबांनी पाठवलेल्या पैशाच्या जोरावर तो आता सिगरेट ओढू लागला, दारू पिऊ लागला. दिवसा मागून दिवस असेच वाया घालू लागला. मिळेल त्या एकांतात हस्तमैथून करू लागला. या सगळ्या गोष्टी मध्ये त्याची तब्येत आता खालावली होती. खानावळीत जेवण,रात्रीच मित्रांसोबत गप्पा मारत जागरण
