नकळत जेव्हा मज तु पहावे !! क्षणही ते तिथे रहावे !! हरवून जावे सारे काही !! माझ्यात तेव्हा तूच उरावे !! शब्दही ते जणू मिळावे !! अलगद त्या कवितेत लिहावे !! कोरून ते नाव असे की!! प्रेम मनातले तुझं ते कळावे !!
असेच सोडून जाऊ नकोस || Virah Kavita || Love Poems ||
वाईट कदाचित ही वेळ असेल !! उगाच सोबत घेऊ नकोस !! सुखी क्षणांच्या आठवांना तू !! असेच सोडून जाऊ नकोस !! बरंच काही आहे मनात !! मनात त्या साठवू नकोस !! भरल्या डोळ्यांनी आज तू !! असेच सोडून जाऊ नकोस !! मी दोन पावले पुढे येईल !! तूही तिथे थांबू नकोस !! जड त्या पावलांन सवे तू !! असेच सोडून जाऊ नकोस !!