कविता चित्रावर, मराठी चित्रकविता, अव्यक्त प्रेम कविता, कवितेच्या जगात, लव्ह स्टोरी

“तो तिकडं पाणी भरतोय !! तुझ्या इलाजाचे पैसे नव्हते त्याच्याकडे, म्हणून करतो म्हणाला काम !!”
शांताला हे कळताच तिला रडू कोसळलं. आपल्या पदराला मुठीत आवळून आपला हुंदका तिने दाबला आणि पटकन उठली, तरातरा चालत ती विहीर जवळ आली.
“कशासाठी एवढी कष्ट ?? मी जगावं म्हणून ना ?? पण तुमच्या जीवाचा तरी विचार करा !!” शांता सखाच्या जवळची कळशी घेत म्हणाली.
“शांता मग करायचं तरी कोणासाठी सांग ना ?? हे शरीर देवाने एवढं टिकवल ते उगाच नाही !! जा बस तिथे माझं झालाच आहे !! ”
” नाही ! मीपण मदत करणार तुम्हाला !!”
“नाही म्हटलं ना !! जा !!”