सखा एवढे बोलून सुसाट पळत सुटला. हातात डबा घेऊन , कुठंही तो सांडू नये म्हणून काळजी घेत. पोटातली आग त्याला जाळत होती. हातात अन्न होत पण तो घास त्याच्यासाठी देवाने लिहिला नव्हता. अनवाणी पायाने त्या सावंतवाडीकडे तो जोरात धावत सुटला. उन्ह डोक्यावर होत. ओठ कोरडे होते, हातात तो डबा होता, आणि त्याला समोर फक्त सावंतवाडी दिसत होती. क्षणही सुसाट धावत होते. आणि सखाही !!
सुर्यास्त || कथा अंतीम भाग || SURYAST MARATHI KATHA ||
"समीर , तुझ्याशी बोलायचं आहे थोड!!" समीरची आई समीरकडे पहात म्हणाली. "काय आई !! बोलणं!!! " "कित्येक दिवस झाले मी एक गोष्ट पाहतेय !! तू सायालीशी काहीच बोलत नाहीस , ती आली की निघून जातोस !! भांडणं झाल का तुमचं ??"