शुभ्र वस्त्र नेसूनी, चांदण्यात मग हरवूनी !!
रात्रीस त्या बोलता, हळुच तो हसला !!

शुभ्र वस्त्र नेसूनी, चांदण्यात मग हरवूनी !!
रात्रीस त्या बोलता, हळुच तो हसला !!
मला माझ्यात पाहताना
तु स्वतःत एकदा शोधुन बघ
डोळ्याच्या या पापण्यांन मध्ये
मला एकदा सहज बघ
मी तिथेच असेन तुझी वाट पहात
मला एकदा भेटुन बघ
मनातल्या भावनांना
ओठांवरती आणुन बघ
वाटा शोधत होत्या मला
मी मात्र स्वतःतच गुंतलो होतो
बेबंद वार्या सोबत
उगाच फिरत बसलो होतो
वळणावर येऊन सखी ती
सोबत येण्यास तयार होती
मी मात्र परक्याच्या घरात
उगाच भांडत बसलो होतो
“सांभाळला तो पैसा
न जपली ती नाती
स्वार्थ आणि अहंकार
ठणकावून बोलती
निकामी तो पैसा
शब्द हेच सोबती
आपुलेच सर्व..