शर्यत || कथा भाग ४ || Sharyat || katha bhag 4 ||

शर्यत (कथा भाग ४ ) || Sharyat katha bhag 4 ||

"भूक लागली असलं ना ??" सखा एकटक तिच्याकडे पाहत म्हणाला. तिला पाण्याचा तांब्या त्याने दिला. शांता पाणी घटाघटा प्याली. "पोटात भुकेन कावळे वरडायलेत !!" शांता पाण्याचा तांब्या खाली ठेवत म्हणाली. "चल मग जेवूयात !! " सखा तिला उठवत म्हणाला. "जेवण ??" सखा फक्त तिच्याकडे पाहून हसला. "तुम्ही केलंत ??" "हो !! "