विठू माउली ..🙏

“विठू चरणी आज ,दुमदुमली पंढरी
साद एक होता, भरली ती पंढरी
एक ध्यास , एक ओढ , चंद्रभागेच्या त्या तीरी
विठ्ठल विठ्ठल नामात सारी, तल्लीन ही पंढरी

उभा तो विठू सावळा, एका त्या विठेवरी
तहान भूक , उन्ह नी वारा , विसरले ते वारकरी
भेटीस त्या विठ्ठलाच्या, आले ज्ञानोबा माउली
टाळ मृदंग वाजत आज, हरवली ती पंढरी

एक भाव , एक मन ,गाते ती पंढरी
तुकोबांचे अभंग सारे , बोलते ही पंढरी
व्यापून सारे आकाश, आपुली ही पंढरी
नाव घेता विठू रायाचे , नजरेत एक पंढरी

विठ्ठल विठ्ठल नामात सारी ,तल्लीन ही पंढरी ..!!!”

✍️©योगेश खजानदार

राजं मुजरा..🙏

“शस्त्र, शास्त्र आणि शौर्य
यांचं एक रूप राजं माझे
हाती भवानी तलवार
ध्येय हिंदवी स्वराज्य
आणि वादळाशी झुंज
असे आहेत राजं माझे

थरथरला गनीम जिथं
झुकल्या कित्येक माना इथ
आई भवानीचा आशीर्वाद घेऊन
साकारले स्वप्न रयतेचे जिथं
असे आहेत राजं माझे

तळपत्या त्या सूर्या सम तेज
आकाश कवेत यावे असे हृदय
वाऱ्यासही हेवा अशी ती दौड
बरसत्या त्या सरींची तमा न ज्यांस
असे आहेत राजं माझे

प्रत्येक मावळ्यात एक विचार
गडकोट आजही करतो जयजयकार
ज्यांनी घडवला इतिहास
हृदयात आता एकच नाव
असे आहेत राजं माझे

गेली कित्येक वर्ष तरी आज
अखंड तेवत आहे एक ज्योत
हिंदवी स्वराज्य संस्थापक
राजा शिवछत्रपती ज्यांचे नाव
असे आहेत राजं माझे..!”

✍️©योगेश खजानदार