दुसऱ्या दिवशी पुन्हा तो सकाळी लवकर उठतो, अभ्यास करतो. पेपरला लवकर जातो. पण मनात सायलीला भेटायला जायचं हे ठरवून जातो. काल सारखेच एक वर्गशिक्षक येतात. प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका देतात. आकाश पेपर लिहू लागतो. पण त्याच लक्ष पुन्हा पुन्हा मनगटावरच्या घड्याळात राहत.
