घरात सगळे एकत्र असताना कशाला हवा मोबाईल ?? द्या तो ठेवून बाजूला, करा टीव्ही बंद आणि आपल्या घरच्या लोकांसोबत मजा करा मिळालेला हा वेळ. कित्येक दिवस वडलांशी मनसोक्त बोलणंच झालं नव्हतं मग बोला त्यांना , मुलांना वेळच देता येत नव्हता , मग द्या त्यांना वेळ, आपण नेहमी म्हणतो की आमचा काळ खूप मस्त होता , मग तोच काळ पुन्हा आणा आपल्या घरात, तासनतास गप्पा मारा , गाण्याच्या भेंड्या खेळा, पत्ते, सापशिडी, बुद्धिबळ असे कित्येक खेळ आहेत जे आपण आपल्या घरच्या सोबत खेळू शकतो, सांगा आपल्या मुलांना की आम्ही या मोबाईल शिवाय आनंदी होतो. कारण आम्ही प्रत्येक क्षण आनंदाने जगत होतो.
