आकाश लगबगीने निघाला. दिपकने जेव्हापासून सायली येणार आहे हे सांगितलं तेव्हापासून त्याला कधी एकदा तिला भेटेन अस झालं होत. बसमध्ये सुद्धा त्याच्या मनात तिचेच विचार होते,
“दिप्या म्हणाल्या पासून मला खरंच काहीच कळतं नाहीये की सायली खरंच माझ्यावर प्रेम करत असेल का? पण मग आजपर्यंत ती कधीच का मला बोलली नाही. शाळेच्या ग्रूपमध्ये सुद्धा ती मला बोलली नाही. मग मला कसे समजणार की ती खरंच माझ्यावर प्रेम करते ते. तिला पाहून आता वर्ष दीडवर्ष होऊन गेले असतील.
