स्मशान.. (कथा भाग ४) || SMASHAN MARATHI KATHA ||
दत्तू जवळ येऊन बसला. लगबगीने चालत आल्यामुळे त्याला धाप लागली होती. शिवा त्याला तसे पाहून म्हणाला.
“अरे !! एवढं काय काम काढलंय दत्तू !! धापा टाकत आलास !!हे बघ काही दुसरं काम असल तर आत्ताच जमणार नाही बघ !! सरपंचाच काम करतोय !!