पाहता पाहता शर्यतीचा दिवस उजाडला. सखा सकाळी उठून सगळं आवरू लागला. शांता कशीतरी उठण्याचा प्रयत्न करत होती. पण तिला उठताच येत नव्हतं. तिची ती धडपड पाहून सखा तिच्या जवळ जात म्हणाला. "बसून राहा शांता, तापेचा जोर खूप वाढलाय
शर्यत || कथा भाग १ || MARATHI STORIES || KATHA ||
सखा एवढे बोलून सुसाट पळत सुटला. हातात डबा घेऊन , कुठंही तो सांडू नये म्हणून काळजी घेत. पोटातली आग त्याला जाळत होती. हातात अन्न होत पण तो घास त्याच्यासाठी देवाने लिहिला नव्हता. अनवाणी पायाने त्या सावंतवाडीकडे तो जोरात धावत सुटला. उन्ह डोक्यावर होत. ओठ कोरडे होते, हातात तो डबा होता, आणि त्याला समोर फक्त सावंतवाडी दिसत होती. क्षणही सुसाट धावत होते. आणि सखाही !!