“विठू चरणी आज ,दुमदुमली पंढरी
साद एक होता, भरली ती पंढरी
एक ध्यास , एक ओढ , चंद्रभागेच्या त्या तीरी
विठ्ठल विठ्ठल नामात सारी, तल्लीन ही पंढरीउभा तो विठू सावळा, एका त्या विठेवरी
तहान भूक , उन्ह नी वारा , विसरले ते वारकरी
भेटीस त्या विठ्ठलाच्या, आले ज्ञानोबा माउली
टाळ मृदंग वाजत आज, हरवली ती पंढरीएक भाव , एक मन ,गाते ती पंढरी
तुकोबांचे अभंग सारे , बोलते ही पंढरी
व्यापून सारे आकाश, आपुली ही पंढरी
नाव घेता विठू रायाचे , नजरेत एक पंढरीविठ्ठल विठ्ठल नामात सारी ,तल्लीन ही पंढरी ..!!!”
✍️©योगेश खजानदार
Tag: बार्शी
बार्शीची मुलं
तस तर आमच्या बार्शी बद्दल वेगळं असं काही सांगायची गरजच पडतं नाही. बार्शीकर कुठे ही गेले तरी त्याची ओळख लगेच पटते. कारण. ..
” जिव्हाळा जिथे
प्रेम तिथे
अशी बार्शीची मुले.
मित्र जिथे
मैत्री तिथे
अशी बार्शीची मुले
ज्ञान जिथे
विचार तिथे
अशी बार्शीची मुले
आदर जिथे
संस्कार तिथे
अशी बार्शीची मुले
वाट जिथे
जिद्द तिथे
अशी बार्शीची मुले
भगवा जिथे
भक्ती तिथे
अशी बार्शीची मुले
शिवराय जिथे
मावळा तिथे
अशी बार्शीची मुले
बार्शी जिथे
सरशी तिथे
अशी बार्शीची मुले …!!!!”
-Yogesh khajandar