प्रेम कविता

कळत नकळत. .. || KALAT NAKALAT MARATHI KAVITA ||

कळत नकळत कधी
प्रेम मी केल होतं
तुला सांगावंस वाटलं
पण मनातच राहिल होत

चांदण्या मधील एक तु
खुप मी शोधलं होतं
चंद्रामागे शोधायचं
शेवटी मात्र राहिलं होतं

एकदा तु सांग ना || DHUND HE SANJ VAARE || SANJ KAVITA |

धुंद हे सांज वारे
छळते तुला का सांग ना?
का असे की कोण दिसे
एकदा तु सांग ना!!

डोळ्यात हे भाव जणु
विरह हा तो कोणता
भावनेस शब्द दे
एकदा तु सांग ना!!

नात

कधी मनात एकदा
डोकावून पहावे
नात्या मधले धागे
जुळवून बघावे
असतील रुसवे फुगवे
बोलुन तरी पहावे
घुसमटून गेलंय मन

नकळत तेव्हा कधी || NAKALAT TEVHA || PREM KAVITA ||

नकळत तेव्हा कधी
चुक ती झाली होती
प्रेम झाल अचानक
जेव्हा ती लाजली होती

ठरवल होत तेव्हाच
आपल्याला हीच पाहिजे होती
कस विचारू तिला
जेव्हा ती अनोळखी होती