भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !!
तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ??

भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !!
तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ??
शुभ्र वस्त्र नेसूनी, चांदण्यात मग हरवूनी !!
रात्रीस त्या बोलता, हळुच तो हसला !!
वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !!
धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !!
मी उगाच वाट पाहत बसलो, जिथे कोणी येणारच नाही !!
मी उगाच अश्रू ढाळत बसलो, जिथे त्यास किंमतच नाही !!
छोट्या छोट्या आठवांची, सोबत ती किती असावी !!
मी सहज लिहावे, जणू कविता ती व्हावी !!
ओढ मीठीची अशी ती जणू, वेड मला का लावी ?
हळूवार स्पर्श जाणवतो असा की, जणू प्राजक्त ती बहरावी !!
बहरून गेल्या फुलात, गंध दरवळून ते जावे !!
तुझ्या माझ्या नात्यात, जणू पहाट घेऊन यावे !!
कधी सावरावे तू, कधी सावरून मी घ्यावे !!
कधी बोलावे तू, कधी अबोल मी ऐकावे !!
वाऱ्यास न व्हावा, भार तो कोणता!! दाही दिशा, मार्ग दिसावे !!
स्वार होऊन, निघता ते मग!! आभाळ नभी त्या, दाटून यावे !!