"हाय , मला वाटलं तू मेसेज करायची विसरून जाशील !!" आकाशने मेसेज केला. "अशी कशी विसरून जाईल मी !! बघ केला की नाही मेसेज !!" "हो !! केलास !! बरं वाटलं मेसेज आला ते !!" "का बरं ? " "म्हणजे !! मित्र कॉन्टॅक्ट मध्ये असले की बर असत ना !! म्हणून !!" "अच्छा !! म्हणून इतक्या दिवस मेसेज केला नाहीस का ??"
वर्तुळ || कथा भाग ४ || मराठी रंजक गोष्टी ||
पंख पसरून तारुण्याकडे पाहताना सगळं कसं नकळत भेटत जात, त्याच कुतूहल वाटायला लागतं. आपण आता मुक्त आहोत सारं जग आपल्या हाती आहे हा आविर्भाव मनात यायला लागतो. आणि तसच काहीस आकाशला वाटू लागलं होत. सगळं अगदी सहज सोप असतं आणि जीवन याचंच नाव असतं अस त्याला वाटू लागलं