न मी उरले माझ्यात आता
तुझ्यात जरा शोधशील का ..??
भाव या मनीचे माझ्या तू
नकळत आज ओळखशील का .??

न मी उरले माझ्यात आता
तुझ्यात जरा शोधशील का ..??
भाव या मनीचे माझ्या तू
नकळत आज ओळखशील का .??
असं नाही की तुझी आठवण येत नाही
पण आता तुझ्या आठवणीत मी रमतही नाही
समजावतो या मनास आता पण ते ऐकत नाही
क्षणभर तरी ते तुला भेटल्या शिवाय राहत नाही
उगाच भांडत बसत ते माझ्याशी
आणि तुला बोलल्या शिवाय राहत नाही
सांग मी काय करू आता माझच मन माझे ऐकत नाही
एकदा का त्या नात्याचा सूगंध आपल्या आयुष्यात पसरला की पुन्हा पुन्हा ते नातं आपल्याला जवळ ओढतं जातं. फुलपाखरा सारखं ते तिथेच भिरभिरत राहतं. त्यास पहाण्यास हे वेड मन अतुर होतं राहतं.