"शीतल !! एवढ्या सकाळी कॉल केलास !! सगळं ठीक आहेना ??"
"हो समीर !! सगळं ठीक आहे !! त्रिशा उठली नाही का झोपेतून अजून ??"
"नाही !! नाही उठली अजून !! अक्च्युली ती रात्रभर झोपलीच नाही!! जागीच होती!! थोडा वेळ झोप लागलीच तर लगेच दचकून उठायची आणि रडायला लागायची !! पहाटे ४ला आईने तिला तिच्याकडे घेऊन गेली तेव्हा कुठे शांत झोपली. "
" रात्रभर जागी होती !!" शीतल शांत आवाजात विचारतं होती.
"हो!! पण आता काही टेन्शन नाहीये !! झोपली आहे आता शांत !! मी आता थोड्या वेळाने ऑफिसला निघतोय !! आई घेईन काळजी तिची !! खरतर माझ्यापेक्षा आईकडेच जास्त राहते ती. सतत आईच्या मागे रांगत रांगत फिरत असते ती !! काल तुझ्याशी बोललो ते मग इथेच माझ्याजवळ राहिली !! "
शीतल शांत राहिली. तिला काय बोलावं काहीच कळत नव्हतं. ती फक्त समीर सांगेन ते ऐकत होती. तिलाही समीरला सांगायचं होत की तीही रात्रभर त्रिशाच्या आठवणीत झोपली नाही.