“हल्ली तुझ्यात नी माझ्यात !…

“हल्ली तुझ्यात नी माझ्यात !…
नकोच आता भार आठवांचा
नकोच ती अधुरी नाती
नकोच ती सावली आपुल्यांची
नकोच त्या अधुऱ्या भेटी
बरेच उरले हातात त्या
रिक्त राहिली तरीही नाती
डोळ्यातल्या आसवांना विचारे
वेदनेची गोष्ट ती कोणती
असं नाही की तुझी आठवण येत नाही
पण आता तुझ्या आठवणीत मी रमतही नाही
समजावतो या मनास आता पण ते ऐकत नाही
क्षणभर तरी ते तुला भेटल्या शिवाय राहत नाही
उगाच भांडत बसत ते माझ्याशी
आणि तुला बोलल्या शिवाय राहत नाही
सांग मी काय करू आता माझच मन माझे ऐकत नाही
साऱ्या साऱ्या रित्या केल्या
कालच्या आठवणीं
सांग सांग काय सांगू
तुझ्या विन न उरे काही
मी आजही त्या क्षणाना
तुझ्याच आठवणी सांगतो
कधी शोध माझा नी
तुझ्यातच मी हरवतो
नसेल कदाचित वाट दुसरी
मी तुलाच या ह्रुदयात पाहतो
आयुष्य क्षणा क्षणात जगताना
विसरून जातो आपल्याना भेटायला
कधी मावळतीकडे पहाताना
वळुन पाहतो आपल्याच सावल्यांना
नाही म्हटलंच तरी आठवणींत या
कोणीतरी दिसतो आपली साथ द्यायला
विस्कटलेलं हे नातं आपलं
पुन्हा जोडावंस वाटलं मला
पण हरवलेले क्षण आता
पुन्हा सापडत नाहीत
कधी दुर अंधुक आठवणीत
तु दिसली होतीस मला
वाटलं होतं पुन्हा भेटावं
पण धीरच झाला नाही
काही क्षण बोलतात
काही क्षण अबोल असतात
काही क्षण चांगले
तर काही क्षण वाईट असतात
आपले कोण असतात
परके कोण असतात
क्षण जसे बदलतात
नाते तसे बोलु लागतात