एक ती

एक अल्लड नटखट रूप सुंदरी
पाहता क्षणी मनात भरली
शब्दांसवे खूप बोलली
कवितेतूनी भेटू लागली

कधी गंधात त्या दरवळून गेली
कधी फुलांसवे हरवून चालली
कधी त्या स्वप्नी येऊन गेली
कधी अलगद मिठीत विरली

कवितेतील ती ..!!

सोबतीस यावी ती
उगाच गीत गुणगुणावी ती
अबोल नात्यास या
पुन्हा बहरून जावी ती

रिमझिम पाऊस ती
एक ओली वाट ती
मनातल्या आकाशात या
इंद्रधनुष व्हावी ती

माझ्यातील ती

मी पाहिलय तुला
माझ्या डोळ्या मध्ये
समोर तु नसताना
माझ्या आसवांना मध्ये
झुरताना मनातुन
माझ्या कविते मध्ये
शब्दाविना गुणगुणत
माझ्या गाण्या मध्ये